श्री. देवेंद्र फडणवीस, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
राज्याच्या काही भागात दर दोन वर्षांनी या - ना - त्या कारणांनी निर्माण होणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या नाविण्यपूर्ण योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेद्वारे २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा केलेला निर्धार खऱ्या अर्थाने क्रांतिकारीच…
या योजनेविषयी थोडेसे...
‘जलयुक्त शिवार’ अभियानाचे काही प्रमुख उद्देश…
- पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे.
- भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे.
- राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता निर्माण करणे.
- भूजल अधिनियमाची अंमलबजावणी.
- विकेंद्रीत पाणीसाठा निर्माण करणे.
- पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे.
- अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदि जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे.
- जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे.
- पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे.
अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी…
- विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावर विभागीय समन्वय समिती.
- जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय समिती.
- उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर तालुकास्तरीय समिती.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे…
- पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंट नालाबांधाची खोलीकरण आणि रुंदीकरणासह कामे.
- जुन्या जलसंरचनांचे पुनर्जीवन.
- कोल्हापूर पद्धतीच्या व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती.
- पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती.
- नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे.
- पाझर, गाव, साठवण, शिवकालीन, ब्रिटीशकालीन आणि निजामकालीन तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे.
- मध्यम व मोठ्या प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणे.
- छोटे ओढे/नाले जोड प्रकल्प राबविणे.
- विहीर/बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण.
- कालवा दुरुस्ती या उपाय योजनावर भर.
अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्यांना पुरस्कार…
- तालुकास्तरावर दोन.
- जिल्हास्तरावर दोन.
- विभागीय स्तरावर दोन.
- राज्य स्तरावर तीन तालुके.
- प्रभावी जनजागृती आणि प्रसिद्धीविषयक उत्कृष्ट लेखन करणाऱ्या पत्रकारांसाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर प्रत्येकी तीन पारितोषिके.
जलयुक्त शिवार मोबाईल अॅप्लीकेशन
जलसंधारण विभागाच्या दि. ०५ डिसेंबर, २०१४ रोजीच्या शासन निर्णयातील मु. क्र. २२ अभियानाची फलनिष्पत्ती यामध्ये GPS (Global Positioning System) Monitoring बाबत नमूद करण्यात आले आहे. त्याद्वारे प्रत्येक कामाचे आक्षांश व रेखांश प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी घेण्यात येउन त्यानुषंगाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांची भौगोलिक माहिती व फोटो प्रणालीद्वारे नोंद घेण्यासाठी MRSAC (Maharashtra Remote Sensing Application Centre) या संस्थेच्या माध्यमातून Mobile Application विकसित करण्यात आले असुन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर याच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे देण्यात येत आहेत.
गाईडलाइनसाठी क्लिक करा
जलयुक्त शिवार अभियानाचे MRSAC मोबाईल अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...
डाऊनलोड Mobile APK